दुपारी आजारी असणारे नितेश राणे थेट गेव्यात; मोदींच्या सभेला हजेरी
दुपारी आजारी असणारे नितेश राणे संध्याकाळी मात्र गोव्यात मोदींच्या सभेत (Pm Modi Speech) दिसले. गोव्यात मोदींच्या सभेत राणे पहिल्या रांगेत बसले होते. मोदी ज्यावेळी स्टेजवर आले, त्यावेळी मोबाईलचा टॉर्च चालू करून त्यांनी मोदींचं स्वागतही केलं. त्यामुळे दुपारी आजारी असणारे राणे संध्याकाठी ठणठणीत कसे झाले? अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
गोवा : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात गेल्या काही दिवासांपासून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अटकेत होते. काल त्यांना कोर्टाने जामीन मंजूर करत दिलासा दिला. पण त्यावेळी राणेंची तब्येत बरी नसल्याने राणेंना (Nitesh Rane Health) कोल्हापुरातल्या रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आज दुपारी राणे बाहेर आले. त्यानंतर माध्यमांना त्यांनी तब्येत अजूनही बरी नसल्याचे सांगितले. मात्र दुपारी आजारी असणारे नितेश राणे संध्याकाळी मात्र गोव्यात मोदींच्या सभेत (Pm Modi Speech) दिसले. गोव्यात मोदींच्या सभेत राणे पहिल्या रांगेत बसले होते. मोदी ज्यावेळी स्टेजवर आले, त्यावेळी मोबाईलचा टॉर्च चालू करून त्यांनी मोदींचं स्वागतही केलं. त्यामुळे दुपारी आजारी असणारे राणे संध्याकाठी ठणठणीत कसे झाले? अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.