Special Report | Bhagavad Gita च्या पठणावरुन नवा वाद! -tv9
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. नितेश राणे यांनी या पत्रातून भगवदगीतेचं पठण करण्याचा मुद्दा मांडला आहे. भगवदगीतेच्या पठणाला होणारा विरोध दुर्दैवी आहे. आपल्या शाळांमध्ये भगवदगीतेचे पठण होणार नसेल तर 'फ़तवा-ए-आलमगीरी' पठण करायचं का? असा सवाल राणे यांनी केला आहे.
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. नितेश राणे यांनी या पत्रातून भगवदगीतेचं पठण करण्याचा मुद्दा मांडला आहे. भगवदगीतेच्या पठणाला होणारा विरोध दुर्दैवी आहे. आपल्या शाळांमध्ये भगवदगीतेचे पठण होणार नसेल तर ‘फ़तवा-ए-आलमगीरी’ पठण करायचं का? असा सवाल राणे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या योगिताताई कोळी यांनी भगवदगीतेचं पठण व्हावं असा प्रस्ताव मांडला. समाजवादी पक्षानं त्या प्रस्तावाला विरोध केला. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र म्हणून तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो, असं नितेश राणे म्हणाले आहेत. प्रस्तावाला मान्यता देण्याचे आदेश तुम्ही द्यावेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे. नितेश राणे यांनी याविषयी एक व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. त्या ते भारताचा उल्लेख हिंदू राष्ट्र असा करताना दिसत आहेत.