Special Report | भाजपचे आमदार नितेश राणेंना अटक होणार?

| Updated on: Dec 30, 2021 | 10:26 PM

संतोष परब मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना झटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता जामिनासाठी नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंधुदुर्ग : संतोष परब मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना झटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता जामिनासाठी नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्नीसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर नितेश राणेंचे वकील अॅड. संग्राम देसाई हे निकालाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अॅड. संग्राम देसाई यांनी नारायण राणे यांची भेट घेत त्यांना कोर्टाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यावेळी उद्या मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं. त्यानंतर नारायण राणे हे पत्नीसह मुंबईकडे रवाना झाले. तर देसाई हे उद्या मुंबईला जाणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात संग्राम देसाई यांच्यासह अजून काही ज्येष्ठ वकील नितेश राणे यांची बाजू मांडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Published on: Dec 30, 2021 10:26 PM
Rajesh Tope | ‘नवीन वर्ष कोरोनामुक्त करण्यासाठी नियमांचं पालन करा, काळजी घ्या’
Special Report | ओमिक्रॉन भारतासाठी शाप ठरणार की वरदान ?