संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपा नेते नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष परब यांच्यावर जो हल्ला झाला त्यामागे नितेश राणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपा नेते नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष परब यांच्यावर जो हल्ला झाला त्यामागे नितेश राणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी जे आरोपी पकडले त्यांनी नितेश राणे यांच्याशी संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला असं आम्ही ऐकले आहे. यावरून नितेश राणे हेच या हल्लामागे असावेत असे विनायक राऊत यांनी म्हटले आहेत. दरम्यान आता नितेश राणे आपल्यावरील आरोपांना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Published on: Dec 30, 2021 09:35 AM