Kalyan Local Train | कल्याण रेल्वे स्थानकात पासची तपासणी नाही, तपासणीच होत नसल्याने घुसखोरी

| Updated on: Aug 16, 2021 | 10:11 AM

प्रवाशांची कुठल्याही प्रकारची तपासणी कल्याण रेल्वे स्थानकात केली जात नसल्याचं समोर आलंय. जो प्रवासी येईल तो बिनधास्तपणे रेल्वे स्थानकात घुसत आहे. त्यामुळे अधिकृत प्रवाशांसोबत अनधिकृत प्रवाशांचीही घुसखोरी सर्रासपणे रेल्वे स्थानकात होत असल्याचं पाहायला मिळतंय.

मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकातून मोठ्या संख्येने चाकरमानी दररोज मुंबईला प्रवास करतात. ज्या प्रवाशांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले असतील, त्यांनाच रेल्वेकडून पास देण्यात आला आहे. मात्र, आज सकाळची कल्याण रेल्वे स्थानकातली परिस्थिती पाहिल्यानंतर कोरोनाचं सर्टिफिकेट दाखवून सही शिक्का घेण्यासाठी लागलेल्या रांगा, त्यानंतर पाससाठी लागलेल्या रांगा, हे सगळं करून काय उपयोग झाला? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण इतकं सगळं करूनही रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची कुठल्याही प्रकारची तपासणी कल्याण रेल्वे स्थानकात केली जात नसल्याचं समोर आलंय. जो प्रवासी येईल तो बिनधास्तपणे रेल्वे स्थानकात घुसत आहे. त्यामुळे अधिकृत प्रवाशांसोबत अनधिकृत प्रवाशांचीही घुसखोरी सर्रासपणे रेल्वे स्थानकात होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Mumbai Unlock | मुंबई अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?
Mumbai Local Train | 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत लाखो मुंबईकरांनी घेतला मासिक पास