Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाला चार दिवस सुट्टी, पण का? आमदारांना काय दिल्या सूचना?

| Updated on: Jul 28, 2023 | 8:13 AM

VIDEO | शनिवारपासून मंगळवारपर्यंत ४ दिवस अधिवेशन नाही, मुसळधार पावसाचं पावसाळी अधिवेशनावरही सावट

मुंबई , 28 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केले आहे. सतत पडणाऱ्या या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे त्यामुळे पूरसदृश्य स्थितीही काही ठिकाणी झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनावरही या राज्यात कोसळणाऱ्या पावसाचं सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कोणताही आढावा घेता येत नसल्याने अनेक आमदारांनी अधिवेशन लवकर संपवा अशी मागणी केली होती. मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाला चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असे चार दिवस अधिवेशन होणार नाही. तर, पुढील बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अधिवेशन होणार आहे. दरम्यान, आमदारांना 4 दिवस मतदारसंघात जाण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहे.

Published on: Jul 28, 2023 08:04 AM