शिवसेनेला कुणीच हायजॅक केलेलं नाही : दीपक केसरकर
शिवसेनेने बाळासाहेबांच नाव वापरु नये अशी तक्रार केली आणि निवडणूक आयोगाने तशी सूचना केली, तर त्याचं पालन करु, असं शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले.
मुंबई: शिवसेनेने बाळासाहेबांच नाव वापरु नये अशी तक्रार केली आणि निवडणूक आयोगाने तशी सूचना केली, तर त्याचं पालन करु, असं शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले. आमच्यापैकी कोणीही दुसऱ्यापक्षात गेलेलो नाही, असही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदेच आमचे गटनेते राहतील. दोन-तृतीयांश बहुमत आम्ही सिद्ध करु असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेना कोणीही हायजॅक केलेली नाही. आम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. शिवसेना हायजॅक केली होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
Published on: Jun 25, 2022 05:27 PM