Chhagan Bhujbal | अजितदादांकडे गेल्यानंतर कोणी रिकाम्या हाताने परतत नाही : छगन भुजबळ
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भुजबळ यांनी शरद पवार यांनी कृषीमंत्री म्हणून कशी क्रांती आणली याबद्दल बोलताना अजित पवार यांच्याबद्दलही कौतुकाचे शब्द उद्गारले.
नाशिक येथे एका क्रिडा संकुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी नाशिकचे पालकमंत्री तसेच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांनी कृषीमंत्री म्हणून कशी क्रांती आणली याबद्दल सांगितले. तसेच अजित पवार यांच्याकडे काम घेऊन गेलेला कोणीही मोकळ्या हाताने परतत नाही असे कौतुकाचे शब्दही भुजबळ यांनी अजित पवारांबद्दल काढले. तसेच कोरोनाबाब जनजागृती करताना त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.