दमदाटी करण्याची भाषा शिवसैनिकांना कोणी सांगू नये : Gulabrao Patil
संजय राऊत यांनी केलेले विधान योग्य तेच आहे पण या विधानाचा कोणी गैर अर्थ घेत असेल तर त्यांना हे सांगू इच्छितो की मनगटात ताकद सर्वांच्याच असते. इथे कोणी कुपोषित नाही वेळ आली की कोणीही निभावून नेऊ शकतो.
मुंबई : मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं हे कोणाला वेगळ सांगायची गरज नाही. जे आम्ही केलं ते छातीठोकपणे केलेलं आहे. संजय राऊत यांनी केलेले विधान योग्य तेच आहे पण या विधानाचा कोणी गैर अर्थ घेत असेल तर त्यांना हे सांगू इच्छितो की मनगटात ताकद सर्वांच्याच असते. इथे कोणी कुपोषित नाही वेळ आली की कोणीही निभावून नेऊ शकतो. दमदाटी करण्याची भाषा शिवसैनिकांना कोणी सांगू नये वेळ आली की दाखवून देऊ, असे गुलाबराव पाटील म्हणाले.