निषेध… निषेध… No वोट, मुंबईच्या ‘या’ भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
पाणी नाही तर मतदान नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्रच पाणीबाणीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी नाही तर मतदान नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्रच पाणीबाणीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. अशातच मुंबईतील कुर्ला विभागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील कुर्ला विभागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच उन्हाळा सुरू असून अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत नाही. कुर्ल्यातील मुरली मिलन सोसायटी, गुप्ता टेरेस, मोरारजी टेरेस येथील रहिवाशी पाण्याच्या समस्येला त्रस्त असल्याची माहिती नागरिकांनी दिली. याच त्रस्त रहिवाशांनी मॅच फॅक्टरी लेन परिसरातील सोसायटी बाहेर बॅनर लावलेत याची सध्या चर्चा आहे. ‘नो वॉटर नो वोट’ , पाणी पुरवठा सुरळीत व्हावा नाहीतर मतदानावर बहिष्कार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने ते लक्ष वेधून घेताय.