Tata Group Future : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? रतन टाटांच्या निधनानंतर कोण ठरलं उत्तराधिकारी?

| Updated on: Oct 11, 2024 | 3:05 PM

भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा हे अंनतात विलीन झाले आहेत. मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटानंतर त्याचा उत्तराधिकारी कोण? याबाबतचा निर्णय समोर आला आहे.

Follow us on

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कोण असणार? कोणाची निवड केली जाणार? अशी चर्चा होत होती. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि टाटा सन्सची जबाबदारी एकाचवेळी सांभाळत होते. ही दोन्ही पदं सांभाळणारे टाटा कुटुंबातील ते अखेरची व्यक्ती होते. त्यामुळे रतन टाटांच्या निधनानंतर उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा होती. दरम्यान, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल नवल टाटा यांची निवड करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टच्या संचालकांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. नोएल टाटा हे सध्या टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. रतन टाटा यांचे निधन बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाले. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सर्वसामान्य लोकांसह उद्योग क्षेत्र आणि राजकीय वर्तुळातील दिग्गजांकडून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात आल्याचे पाहायला मिळाले तर झोपडपट्टी, चाळीत राहणाऱ्या माणसांपासून ते अगगदी टोलेजंग इमारतीतील नोकरदार किंवा व्यवसायिकानं टाटांच्या निधनाने शोक व्यक्त केला.