Amit Thackeray Uncut | कोणतंही सरकार कायम नसतं, नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना

| Updated on: Aug 27, 2021 | 3:58 PM

कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्यापार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे देखील या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजल्यापासून शहराच्या तीनही विभागांमध्ये बैठकांचा आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकांमध्ये पदाधिकार्‍यांशी चर्चा आणि शाखा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मनसे कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची लगबग आहे. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली. एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. अनेक जण असल्याने तीन ठिकाणं बैठकी आहेत. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राजसाहेब सगळीकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून शाखा अध्यक्ष महत्त्वाचा आहे. यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद नाही. शाखाध्यक्ष महत्वाचा आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय, असं अमित ठाकरे म्हणाले.

Uday Samant LIVE | राणेंच्या अॅसिड हल्ल्याच्या आरोपांवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Narayan Rane | विचारधारा स्वीकारुनच भाजपत प्रवेश केला : नारायण राणे