शिंदे गटातील 13 पैकी एकही खासदार निवडून येणार नाही, कुणी केला थेट दावा?
VIDEO | एकही खासदार निवडून येणार नाही, काळ्या दगडावरची रेघ; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
मुंबई : शिंदे गटाच्या शिवसेनेकडे १३ पैकी एकही खासदार निवडून येणार नाही. शिंदे गटाकडे त्यांचे लोकसभेसाठी 13 उमेदवार तरी आहेत का? असा सवाल करत शिंदे गटाचे 13 खासदार पडणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर ते शिवसेनेकडून निवडून आले होते, असे म्हणत 19 चे 19 खासदार आमच्याकडे आहेत. त्या सर्व जागांवर परत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचं मेरिटवर सिलेक्शन होणार आहे. त्यात दूमत नाही. आमचे लोकसभेत 19 खासदार होते. आम्ही 19 खासदार निवडून आणू. आमचे 19 खासदार लोकसभेत असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Published on: May 24, 2023 02:11 PM