माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून अपक्ष लढणार?
भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का?
उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता करत भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम हे मैदानात उतरले आहेत. मात्र याच मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे तसं झालं तर उत्तर मध्य मुंबईतून तिरंगी तढत होऊ शकते. माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस आधिकारी आहेत. डीजी होमगार्ड, पोलीस महासंचालक, मुंबईचे आयुक्त म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावलेलं आहे. यासह आता लोकसभेच्या रिंगणात उतरून वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का? याकडे लक्ष आहे.