Satej Patil : सतेज पाटील भडकले, ‘ही माझी फसवणूक, मला तोंडघशी पाडायची गरज काय? दम नव्हता तर xx मारायला…’

| Updated on: Nov 04, 2024 | 5:47 PM

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ...

उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्या बंडखोरीला कंटाळून मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राजेश लाटकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. दरम्यान, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. “मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना”, असं म्हणत असताना सतेज पाटील हे संतापल्याचे पाहायला मिळाले. “निवडणूक लढायची नव्हती तर मग आधीच निर्णय घ्यायचा होता. कारण ही माझी पूर्णपणे फसवणूक करण्यासारखं आहे. आम्हाला काही अडचण नव्हती. पण आधीच नाही म्हणून सांगायला हवं होतं. हे चुकीचं आहे, मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? हे बरोबर नाही, मला मान्य नाही. अजिबात बरोबर नाही. तुम्ही जेवढ्यांनी आग लावली ना.. तेवढ्या सगळ्यांना सांगतो. मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना मग मी पण दाखवली असती माझी ताकद”, असं म्हणत संताप व्यक्त करत सतेज पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Published on: Nov 04, 2024 05:47 PM