ED शिवाय देशात सध्या काहीच चालत नाही – Sharad Pawar यांचा खोचक टोला
आम्ही सर्वजण सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलेले लोक नाही. आज धाड सुरू त्याचं आश्चर्य वाटत नाही. आम्ही चौकशी करतो. कोल्हापूरची बातमी आली की विचारतो पाहूणे येऊन गेले का. आम्ही प्रेमाची चौकशी सर्वांची एकमेकांची करतो. त्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतर एजन्सी आणि त्याचा वापर राजकीय विरोधकांना संपुष्टात आणण्यासाठी कधी कुणी केला नव्हता.
आम्ही सर्वजण सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलेले लोक नाही. आज धाड सुरू त्याचं आश्चर्य वाटत नाही. आम्ही चौकशी करतो. कोल्हापूरची बातमी आली की विचारतो पाहूणे येऊन गेले का. आम्ही प्रेमाची चौकशी सर्वांची एकमेकांची करतो. त्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतर एजन्सी आणि त्याचा वापर राजकीय विरोधकांना संपुष्टात आणण्यासाठी कधी कुणी केला नव्हता. दहा वर्षापूर्वी ईडी हा शब्द माहीत नव्हता. आज ईडीशिवाय काही चालत नाही, आज याच्याकडे उद्या त्याच्याकडे. आता काही लोक निघाले. आम्ही तुमच्याकडे येणार आहे असं सांगत असतात. येणं थांबवायचं असेल तर काही तरी व्यवस्था करा असं सांगितलं जातं. रेड टाकल्यानंतर सेटलमेट करणं या सर्व गोष्टीसाठी प्रचंड व्यवहाराच्या अपेक्षा आहेत हे ऐकायला मिळतं. हे माहीत असून केंद्र सरकार त्यावर काही करत नाही. म्हणजे या भ्रष्टाचारात केंद्रही सहभागी आहे असं कुणी म्हटलं तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल