राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना कोर्टाची नोटीस, काय आहे प्रकरण?
नागपूर विद्यापीठातील अधिष्ठाता नियुक्तीच्या वादावरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना नोटीस
राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठातील अधिष्ठाता नियुक्तीच्या वादावरून ही नोटीस बजावण्यात आली असून हा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. माजी सिनेट सदस्य मोहन वाजपेयी यांनी प्राचार्य प्रशांत कडू यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. यासह दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यासह नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना देखील उच्च न्यायालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Published on: Jan 31, 2023 09:05 AM