छत्रपती शाहू महाराजांची कोणाला पसंती…पंजा, मशाल की तुतारी?

| Updated on: Mar 06, 2024 | 12:59 PM

कोल्हापुरातील छत्रपती संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण, कोणाकडून लढणार हे अद्याप अनुत्तरित आहे. मविआमध्ये कोल्हापुरातील लोकसभेच्या जागेवरून आणि आणि त्यातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

मुंबई, ६ मार्च २०२४ : कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे लोकसभा लढवणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. मात्र महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा फैसला मात्र छत्रपती शाहू महाराज करणार आहे. दरम्यान, शाहू महाराज यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी, असं आवाहन ठाकरे गटाने केले आहे. मविआमध्ये कोल्हापुरातील लोकसभेच्या जागेवरून आणि आणि त्यातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. कोल्हापुरातील छत्रपती संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण, कोणाकडून लढणार हे अद्याप अनुत्तरित आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की, कोल्हापुरातील जागा ठाकरे गटाची आहे. त्यामुळे त्यांनी मशाल चिन्हावर लढावं. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणताय, कोणाच्या तिकीटावर लढायचं हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतः ठरवावं. त्यामुळे शाहू महाराज आता कोणत्या चिन्हावर लोकसभा लढणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 06, 2024 12:59 PM
महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अमित शाह सोडवणार? दोन दिवसात होणार फैसला, कुणी काय केला दावा?
अमित शाह यांचं ‘मिशन विदर्भ’, दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा अन् ‘मविआ’वर जोरदार हल्लाबोल