Raj Thackeray MNS : राज ठाकरेंच्या हातून ‘रेल्वे इंजिन’ जाणार? मनसेचे शून्य आमदार, पक्षाची मान्यता धोक्यात?

| Updated on: Nov 25, 2024 | 10:31 AM

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या मनसेचं चिन्ह सुद्धा धोक्यात आलंय. तर यंदा विधानसभा निवडणुकीला एकही आमदार निवडून आला नाही. त्यात त्यांची टक्केवारी घटल्याने त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या मनसेचं चिन्ह सुद्धा धोक्यात आलं आहे. यंदा विधानसभा निवडणुकीला एकही आमदार निवडून आला नाही. त्यात त्यांची टक्केवारी घटल्याने त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचं सरकार मनसेशिवाय बसू शकत नाही. भाजपचं सरकार आमच्या मदतीने येण्याचा दावा करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर मनसेला यंदा भोपळाही फोडता आला नाही. २००९ ला १३, २०१४ आणि २०१९ ला प्रत्येकी एक तर यंदा २०२४ ला एकही आमदार निवडून आला नाही. माहिममध्ये अमित ठाकरे यांच्या रूपात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील उमेदवार पराभूत झाला आहे. मुंबईत मनसेने भाजपच्या सात जागांवर उमेदवार दिले नव्हते. त्यामध्ये वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आणि मालाड पश्चिममधून त्यांचे बंधू विनोद शेलार यांच्या जागांचा समावेश होता. या सात जागांवर उमेदवारीसाठी कोणीही पुढे आलं नसल्याने उमेदवार न दिल्याचे कारण राज ठाकरेंनी दिलं होतं. मात्र माहिमध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा दिल्यामुळे शेलारांनी त्यांच्या स्वतःच्या जागांविरोधात मनसेचे उमेदवार उभे राहू दिले नाहीत, असं वक्तव् मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलंय.

Published on: Nov 25, 2024 10:31 AM