चंद्रपुरात ओबीसी बचाव परिषद, मनोज जरांगे पाटील यांचा होणार निषेध?

| Updated on: Dec 17, 2023 | 3:11 PM

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात ओबीसी बचाव परिषद आज पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजातल्या विविध जात घटकातील प्रतिनिधी या ओबीसी बचाव परिषदेत सहभागी होणार

चंद्रपूर, १७ डिसेंबर २०२३ : चंद्रपूरमध्ये आज ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात ओबीसी बचाव परिषद आज पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजातल्या विविध जात घटकातील प्रतिनिधी या ओबीसी बचाव परिषदेत सहभागी होणार आहेत. चंद्रपुरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात या ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेच्या ठरावादरम्यान सरकारवर दबाव आणून सतत भूमिका बदलणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ओबीसी बचाव परिषदेकडे संपर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

Published on: Dec 17, 2023 03:02 PM
बडी भाभी म्हणजे देवयानी फरांदे ? ‘त्या’ पत्रावर बोलताना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
बीडच्या १०० एकरात पुन्हा घुमणार जरांगे पाटील यांचा आवाज, इशारा सभेतून कोण असणार टार्गेटवर?