फक्त ओबीसींनाच एंट्री, गावा-गावात पोस्टर, आरक्षणाची लढाई थेट गावबंदीपर्यंत
परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात लागलंय आणि परभरणीच्या मोहाडी गावात फक्त ओबीसींनाच एन्ट्री असे पोस्टर लावण्यात आले आणि काही वेळातच ते काढण्यातही आलेत. या बॅनरवर एकच पर्व ओबीसी सर्व...गाव प्रवेश बंदी अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल...असा आशय लिहिला आहे.
आरक्षणाचा विषय एवढा तापलाय की, गावा-गावात एन्ट्री आणि बंदीचे पोस्टर लागले आहेत. परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात लागलंय आणि परभरणीच्या मोहाडी गावात फक्त ओबीसींनाच एन्ट्री असे पोस्टर लावण्यात आले आणि काही वेळातच ते काढण्यातही आलेत. या बॅनरवर एकच पर्व ओबीसी सर्व… ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये… गाव प्रवेश बंदी अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल…असा आशय लिहिला आहे. तर ओबीसी विरूद्ध मराठा आरक्षणाचा वाद किती पेटलाय हे आता गावा-गावात लागलेल्या पोस्टरववरून स्पष्टपणे दिसतंय. अशा पोस्टरवरून आता जातीवाद कोण करतंय? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. विशेष म्हणजे दोन्ही गावात लावण्यात आलेले पोस्टर सारखेच असून त्यावर मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या ओबीसी नेत्यांचे फोटो आहेत. बघा यासंदर्भात रिपोर्ट
Published on: Jun 25, 2024 10:24 AM