रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर…, मंत्री छगन भुजबळ यांचं मनोज जरांगेना ओपन चॅलेंज

| Updated on: Sep 06, 2024 | 4:29 PM

‘टीव्ही 9 मराठी’चा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमाला आज छगन भुजबळांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी खुलं आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय म्हणाले?

मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनोज जरांगे पाटील यांनी रोज भूमिका बदलू नये. २८८ उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्या हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा, असे म्हणत भुजबळांनी खुलं आव्हान दिलं आहे. तर प्रत्येकवेळी कशाला भूमिका बदलता. उपोषणाला बसतो म्हणतात आणि उठतो. मग म्हणतात मुस्लिमाना आरक्षण द्या. अहो मुस्लिमांना आम्ही आरक्षण दिलं. माहीत नसलेल्या गोष्टीवर ते बोलतात. अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात. मध्यचे म्हणतात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार. अरे बाबा तुला काय करायचं ते कर, असे म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना खोचक टोलाही लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले की. जरांगेंनी माझ्यासमोर येऊन उभंच राहावं. ते एकदा म्हणणार,. मला राजकारण नको. मला राजकारणात जायचं नाही. परत २८८ उमेदवार पाडण्याचा विचार करणार. एक एकाला बोलावून सर्वांची माहिती घेत आहेत. फार काही चालू आहे. त्यांना फार गंभीर घेऊ नका, असेही छगन भुजबळांनी म्हटले.

Published on: Sep 06, 2024 04:29 PM
‘लाडकी बहीण’ दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?
‘मी सर्व अंगावर परफ्यूम-सेंट मारून जातो, उलट्या कशा होतील’, भुजबळांचा कुणाला खोचक टोला?