मुस्लिमांनाही कुणबीतून आरक्षण? जरांगेंच्या ‘त्या’ मागणीनंतर लक्ष्मण हाकेंचं म्हणणं काय?
राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यानंतर यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेला आहे. पण मुस्लीम समाजाकडे धर्म म्हणून बघितलं जातं. त्यांच्यात सारखी अडनावं आहेत. तर...'
जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यानंतर यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेला आहे. पण मुस्लीम समाजाकडे धर्म म्हणून बघितलं जातं. त्यांच्यात सारखी अडनावं आहेत. जाती नसल्याने त्यांच्यातील कारू आणि नारू, असे दोन गट पडतात, यापैकी कारू हा व्यवसाय करणारा घटक आहे. त्यामुळे त्यांना संविधानानुसार स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिलं जातं’, असं लक्ष्मण हाके म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, मनोज जरांगेंनी आरक्षणाची पॉलिसी समजून घेतली पाहिजे. ओबीसींच्या हक्क आणि अधिकारासाठी शब्बीर अन्सारी यांनी मोठं काम केले आहे. त्यांनी मुस्लिमांच्या अधिकारासाठी जवळपास १०० अध्यादेश सरकारकडून काढून घेतले आहेत. यासंदर्भात शब्बीर अन्सारी सफाईदारपणे उत्तर देऊ शकतात, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मुस्लिम आरक्षणावरही भाष्य केले आहे.