…तेव्हा छगन भुजबळ आमचे नेते अन् तिकीट देण्याची फॅक्टरी, ओबीसी नेत्याच्या मोठ्या वक्तव्यानं चर्चा

| Updated on: Feb 06, 2024 | 4:55 PM

मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची आज भेट झाली. यानंतर ओबीसींचा पक्षनिर्माण करणं गरजेचं आहे असं मत बैठकीत व्यक्त झाले. 'ज्यांनी आमच्या मतांवर डाका टाकलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं म्हणून ओबीसी-भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्षनिर्माण केला. ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम हे जर एकत्र आले तर ८० टक्के व्होट बॅक आमच्याकडे आहे.'

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची आज भेट झाली. यानंतर ओबीसींचा पक्षनिर्माण करणं गरजेचं आहे असं मत बैठकीत व्यक्त झाले तर प्रकाश शेंडगे म्हणाले, ज्यांनी आमच्या मतांवर डाका टाकलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं म्हणून ओबीसी-भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्षनिर्माण केला. ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम हे जर एकत्र आले तर ८० टक्के व्होट बॅक आमच्याकडे आहे. आज छगन भुजबळांचा आशिर्वाद घेण्यास आलो. पुढची रणनिती ठरवणार. आजवर इतर पक्षातील नेत्यांच्या घरासमोर खेटे मारावे लागत होते. आता ओबीसी-भटक्या विमुक्तांना तिकीट देणारी फॅक्टरी काढलीय. आमचा पक्ष, आमची मतं आणि आमचं सरकार असल्याचे त्यांनी म्हटले तर ज्यावेळी भुजबळांना बाहेर पडावंसं वाटेल ते बाहेर पडतील…तेव्हा ते आमच्या पक्षाचे नेते असतील असंही शेंडगे म्हणाले.

Published on: Feb 06, 2024 04:55 PM
आधी हे थांबव… खूप उपकार होतील, छगन भुजबळ यांची हतबल होऊन मनोज जरांगे पाटलांना काय विनंती?
नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या म्होरक्यांची ओळख परेड, बघा व्हिडीओ