सरकारला दिलेल्या जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रकाश शेंडगेंची चिथावणी, कुकरी अन् कोयत्यावरून नवा वाद?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा २० तारखेपासून उपोषणाचा इशारा दिला. इतकंच नाहीतर वेळ पडल्यास मुंबईमध्ये आंदोलन करू, असा इशारा दिला. मात्र या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच वादात आली आहे. बघा काय दिला इशारा अन् नवा वाद निर्माण होणार?
सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा २० तारखेपासून उपोषणाचा इशारा दिला. इतकंच नाहीतर वेळ पडल्यास मुंबईमध्ये आंदोलन करू, असा इशारा दिला. मात्र या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच वादात आली आहे. तर दुसरीकडे सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे एकही दिवस वाया घालवला नसून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं सत्ताधारी नेते म्हणताय. पण सरकारने जर सगेसोयऱ्यांचा अद्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल असा इशारा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. दुसरीकडे एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक करत असे नेते मुस्लिम समाजातून का पुढे येत नाहीत, असं वक्तव्य केलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 15, 2024 11:16 AM