मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता थेट कोर्टात होणार लढाई? बघा टीव्ही ९ चा स्पेशल रिपोर्ट
मराठ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या कुणबी दाखल्यांवरून मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यानंतर ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची भुजबळ आणि फडणवीस यांच्यासोबत बैठक. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता थेट कोर्टात होणार लढाई? बघा टीव्ही ९ चा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ | मराठ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या कुणबी दाखल्यांवरून मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यानंतर ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची आधी छगन भुजबळ आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीच्या सत्रानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी कुणबी दाखल्यावरून कोर्टात जाण्याचा इशारा दिला तर दुसकीकडे मराठा समाजाच्या बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिकाही दाखल केली. छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये नोंदींवरून मराठ्यांना दिल्या जाणाऱ्या कुणबी दाखल्यांना विरोध करण्यात आला. बेकायदेशीपणे मराठ्यांना कुणबी दाखले दिले जात असून कोर्टात जाणार असल्याचा इशाराही दिला गेला. ओबीसींच्या पहिला मेळावा १७ नोव्हेंबरला जालन्याच्या अंबड य़ेथे होणार आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊ नये. असं ओबीसी नेत्यांनी आवाहन केल्याचे पाहायला मिळाले.