वर्ध्यानंतर भिवंडीतही निम्म्या खुर्च्या रिकाम्या अन् मंचावर रंगलं नाराजीनाट्य, नेमकं काय घडलं?
वर्ध्यात ९० टक्के खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या तर भिवंडीमध्येही ५० टक्के सभा स्थळ रिकामं होतं. नियोजित वेळेनुसार ही सभा तीन वाजता होणार होती. पण भुजबळच या सभेला सव्वा ६ पोहचले आणि प्रत्यक्ष सभेला सुरूवात झाली. या सभेत मान-अपमान नाट्यही रंगलं
मुंबई, १७ डिसेंबर २०२३ : भिवंडीमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील ओबीसी मेळावा पार पडला पण वर्ध्याप्रमाणे भिवंडीमध्येही अल्पप्रतिसाद मिळाल्याने ही सभा चर्चेत राहिली. तर भाषण थांबवल्याने मंचावर नाराजी नाज्य पाहायला मिळालं. काल वर्ध्यात ९० टक्के खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या तर भिवंडीमध्येही ५० टक्के सभा स्थळ रिकामं होतं. नियोजित वेळेनुसार ही सभा तीन वाजता होणार होती. पण भुजबळच या सभेला सव्वा ६ पोहचले आणि प्रत्यक्ष सभेला सुरूवात झाली. या सभेत मान-अपमान नाट्यही रंगलं. ओबीसी सभेला आग्री सेनेचे अध्यक्ष राजाराम साळवी हे देखील हजर होते. ज्यावेळी सभास्थळी भुजबळ पोहोचले तेव्हा साळवी यांचं भाषण सुरू होतं. मात्र एका चिठ्ठीद्वारे भाषण अटोपतं घेण्यास सांगितलं. यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Published on: Dec 17, 2023 11:41 PM