Breaking | ओबीसी आरक्षणावर उद्या सुप्रीम कोर्टात दुपारी 2 वाजता सुनावणी

| Updated on: Dec 13, 2021 | 7:32 PM

Obc आरक्षणाच्या याचिकेवर होणारी सुनावणी उद्यावर गेली आहे, ही सुनावणी आता उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. उद्याची सुनावणी ओबीसी आरक्षणाच्या दुष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे.

नवी दिल्ली : Obc आरक्षणाच्या याचिकेवर होणारी सुनावणी उद्यावर गेली आहे, ही सुनावणी आता उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. उद्याची सुनावणी ओबीसी आरक्षणाच्या दुष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जो अध्यादेश काढला होता. तो सुप्रीम कोर्टाने स्थगित केला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत.

मध्य प्रदेशची केसही आपल्यासारखीच

मध्य प्रदेशची केसदेखील काहीशी आपल्या सारखीच आहे. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता OBC प्रकरणावर सुनावणी होईल. अशी माहिती छनगन भुजबळ यांनी दिली आहे. मध्य प्रदेशसाठी तुषार मेहता केस लढत आहेत. इतर राज्यामध्ये देखील आपल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. असंही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. इंपेरिकल डेटावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

Omicron | ओमिक्रॉनचा पहिला बळी ब्रिटनमध्ये, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांची माहिती
Jammu and kashmir मध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 पोलीस शहीद, 3 जणांची प्रकृती गंभीर