OBC Reservation : ‘आमचा पोरगा उपाशी, सरकारनं आमच्या मुलाच्या…’, लक्ष्मण हाकेंच्या आई-वडिलांना अश्रू अनावर
लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे सांगोला तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्या घरी तीन दिवसापासून चूल पेटली नाही. लक्ष्मण हाके यांच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. हाके यांच्या आईची तब्येत खालावत आहे. आपल्या मुलांच्या चिंतेत हाके कुटुंबीय असलेले पाहायला मिळते आहे
ओबीसींच्या लढ्यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे सांगोला तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्या घरी तीन दिवसापासून चूल पेटली नाही. लक्ष्मण हाके यांच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. हाके यांच्या आईची तब्येत खालावत आहे. आपल्या मुलांच्या चिंतेत हाके कुटुंबीय असलेले पाहायला मिळते आहे. मराठा समाजाप्रमाणे सरकारने आपल्या मुलाच्या उपोषणाची दखल घ्यावी. अशी आर्त हाक लक्ष्मण हाके यांच्या आई वडिलांची आहे. अशातच आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे. अशातच ओबीसी नेत्यांच्या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दाखल होत त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी लक्ष्मण हाके याची स्थिती पाहून विजय वडेट्टीवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी त्वरीत उपोषणस्थळाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली.