OBC Reservation : 8 वा दिवस, लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून वडेट्टीवार भावूक; थेट शिंदेंना फोन
ओबीसी नेत्यांच्या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दाखल होत त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी लक्ष्मण हाके याची स्थिती पाहून विजय वडेट्टीवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी त्वरीत उपोषणस्थळाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे. अशातच ओबीसी नेत्यांच्या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दाखल होत त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी लक्ष्मण हाके याची स्थिती पाहून विजय वडेट्टीवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी त्वरीत उपोषणस्थळाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली. ‘लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी यांना म्हणावं, तब्येतीची काळजी घ्या. ओबीसींना कुठेही नुकसान होणार नाही. त्यांचं कारण कुठेही डॅमेज होणार नाही. याची खबरदारी घेतली आहे. ओबीसी आरक्षणाबाबतची आपली याआधी जी भूमिका होती तीच भूमिका आजही आहे.’, असे मुख्यमंत्री वडेट्टीवार यांनी फोनवर म्हणाले. तर आपण उद्या मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ पाठवू, असं आश्वासनही विजय वडेट्टीवार यांना दिलं.