OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

| Updated on: Jul 12, 2022 | 10:42 AM

ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सुनावणी दरम्यान होणाऱ्या युक्तीवादाकडे आणि कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली :  ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी लोकप्रतिनिधींची संख्या आणि ओबीसींचं राजकीय मागासलेपण यासंदर्भातील बांठिया आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला आहे. आज सकाळच्या सत्रात सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सुनावणी दरम्यान होणाऱ्या युक्तीवादाकडे आणि कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ओबीसीचा इम्पेरिकल डेटा पुन्हा गोळा करण्यासाठी राज्याकडून मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार राज्याने आपला डेटा तयार केला आहे. आणि तो इंपेरिकल डेटा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सादर करण्यात आला आहे. बंद लिफाफ्यातील हा अहवाल आता सादर झाला आहे.

 

 

Published on: Jul 12, 2022 10:40 AM
Saamana : फडणवीस-शिंदे सरकार है बेलगाम सत्ताकारणाचे जिवंत उदाहरण, शिवसेनेच्या मुखपत्रातून टीकास्त्र
Nashik : इगतपुरीतील दारणा धरणाचे 52 दरवाजे एकाचवेळी उघडले, सतर्कतेचा इशारा, शाळेला सुट्टी जाहीर