मनोज जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की देशाचा पंतप्रधान? कुणी केला थेट सवाल?
'महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची प्रतिमा खराब झाली असून याला कारणीभूत मनोज जरांगे पाटील आहे. त्यांची भाषा चीड आणणारी आहे,', मनोज जारांगे कोण आहे? घटना तज्ज्ञ की वकील? कुणाचा थेट सवाल?
गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची प्रतिमा खराब झाली असून याला कारणीभूत मनोज जरांगे पाटील आहे. त्यांची भाषा चीड आणणारी आहे, असं वक्तव्य ओबीसी संघर्ष समिती उपाध्यक्ष कुंदन संखे यांनी करत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. सरकारला मनोज जारांगे पाटलांचा बंदोबस्त करावाच लागेल, पालघर जिल्ह्यातील ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याने लाक्षणिक उपोषणासाठी पालघर जिल्ह्यातील अठरापगड जाती सहभागी होणार आहेत. तर मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करत कुंदन संखे यांनी मनोज जारांगे कोण आहे? घटना तज्ज्ञ की वकील? असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
Published on: Jun 24, 2024 02:32 PM