महिला कार्यकर्त्यांबद्दल अश्लील शब्द उच्चारले, प्रभादेवीतील राड्यावर समाधान सरवणकरांचा आरोप
"दरवर्षी गणेश भक्तांसाठी पाणपोईचा मंडप असतो. आमच्यासमोर मनसेचा मंडप असतो. गेल्या 10 वर्षांपासून हे सुरु आहे. काल काही विघ्नसंतोषी लोकांनी वाद घालण्यासाठी तिसरा मंडप उभारला"
मुंबई: “दरवर्षी गणेश भक्तांसाठी पाणपोईचा मंडप असतो. आमच्यासमोर मनसेचा मंडप असतो. गेल्या 10 वर्षांपासून हे सुरु आहे. काल काही विघ्नसंतोषी लोकांनी वाद घालण्यासाठी तिसरा मंडप उभारला. मंडप उभारा, गणपतीची सेवा नक्कीच करा. पण काल तिसरामंडप उभारुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला. स्टेजवरील आमच्या महिला कार्यकर्त्यांबद्दल काही अश्लील शब्दात उच्चारण्यात आले” असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला.
Published on: Sep 10, 2022 06:27 PM