नाना पटोले भावी मुख्यमंत्री ! प्रदेशाध्यक्षांचीही मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये एन्ट्री, कुठं झळकले बॅनर्स?
VIDEO | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे 'भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे झळकले बॅनर्स, कुणी केली पोस्टरबाजी?
भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडाऱ्यात ठिकठिकाणी लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मदन रामटेके आणि युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर हे बनर्स लावण्यात आले आहे. लावण्यात आलेल्या या बॅनरवर नाना पटोले यांच्या नावासमोर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याचे दिसतंय. हे सर्व बॅनर नाना पटोले यांच्या गावापर्यंत लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाना पटोले यांच्या नावाने एन्ट्री केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर चर्चांना उधाण देखील आल्याचे पाहायला मिळतंय.