माघी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरच्या विठुरायाचा सजला गाभारा, बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 01, 2023 | 9:27 AM

झेंडू, गुलाब या फुलांसह देश-विदेशी विविध प्रकारच्या दोन टन वजनाच्या रंगीबेरंगी फुलांची आरास करून विठुरायाचा गाभारा सजला

पंढरपूर : माघी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भाविकांनी काल पासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. आज माघी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आज चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
माघी एकादशीनिमित्त पंढरपुरच्या विठ्ठल आणि रूखमाईच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामध्ये झेंडू, गुलाब या फुलांसह देश-विदेशी विविध प्रकारच्या दोन टन वजनाच्या रंगीबेरंगी फुलांची आरास करून विठुरायाचा गाभारा सजवण्यात आला आहे. माघी एकादशीनिमित्त पुण्यातील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्याकडून पंढरपूर येथे विठ्ठल आणि रूखमाईच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Published on: Feb 01, 2023 09:25 AM
अनिल परब तो बस झांकी है, मातोश्री अभी बाकी है!; नितेश राणे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
अर्थसंकल्प, राजकारण, समाजकारणातील महत्वाच्या 100 बातम्या; पाहा सुपरफास्ट 100