Odisha Train Accident : पंतप्रधान मोदी यांनी बोलवली तातडीने बैठक अन् घेतला रेल्वे दुर्घटनेचा आढावा

| Updated on: Jun 03, 2023 | 2:30 PM

VIDEO | ओडिशा ट्रेन भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार भेट

बालासोर : ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली आणि ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर तर काही डब्बे पलटी झाली. देशातील हा आजवरचा सर्वात भीषण अपघात असल्याचे सांगितले जात असून या घटनेत मृतांची संख्या वाढत चालल्याचं दिसतंय. दरम्यान, या भीषण अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून शोकाकुल परिवारासोबत संवेदना आहेत. जखमी झालेले प्रवासी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना त्यांनी केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्र्यांकडून अपघाताची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळानंतर पंतप्रधान मोदी घटनास्थळी रवाना होणार आहेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी परिस्थितीचा आढावा घेतील. यासोबतच मोदी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळत आहे. जखमींची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी कटक रुग्णालयातही जातील तर बालासोर येथील घटनेत बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान घटनास्थळी उपस्थित आहेत. ते घटनास्थळी जाऊन माहिती घेत असल्याचीही माहिती आहे.

Published on: Jun 03, 2023 02:27 PM
झुके गा नई साला!, पुष्पा गँगला पोलिसांनी बेड्या ठोकल्या; महाराष्ट्रातच झाली सगळ्यात मोठी कारवाई
अन् थोडक्यात चुकामूक झाली; निवृत्ती नाथांच्या दर्शनावेळी संजय राऊत-दादा भूसे आमने-सामने, मात्र….