Ajit Pawar | आपण लोकांचे प्रतिनिधी, बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे अजित पवार यांचा पडळकरांवर निशाणा
विधिमंडळ अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील चांगलीच जुंपली. त्यामध्ये विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांनी पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला. मात्र, अजित पवारांनी तार्तम्य बाळगण्याचा सल्ला दिला.
विधिमंडळ अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील चांगलीच जुंपली. त्यामध्ये विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांनी पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला. मात्र, अजित पवारांनी तार्तम्य बाळगण्याचा सल्ला दिला. पडळकरांवरील हल्ल्यावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले, पडळकर यांच्यावर पोलीस ठाण्यासमोर हल्ला केला. हा हल्ला कसा झाला, हे एका क्लीपमधून समोर आले. विशेष म्हणजे या हल्ल्याचे चित्रिकरण पोलिसांनी केले, असा आरोप त्यांनी केला. मात्र, याप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई न करता गोपीचंद पडळकर यांच्यावर कलम 307 लावण्यात आले.