VIDEO : Mumbai महापालिकेच्या अग्निशमन दलाचा वाझे कोण?, Amit Satam यांचा सवाल
मुंबई महापालिकेच्या अग्निसुरक्षा शुल्क आकारणीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप आमनेसामने आले आहेत. बीएमसीमध्ये अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.
मुंबई महापालिकेच्या अग्निसुरक्षा शुल्क आकारणीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप आमनेसामने आले आहेत. बीएमसीमध्ये अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. भाजपकडून सत्ताधारी शिवसेना निशाण्यावर आली आहे. मुंबई महापालिका 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे पैसे घेतले जाणार आहेत. तर ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतले जाणार आहे.