Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे ‘हे’ अधिकारी बदलले, SIT तील नवे अधिकारी कोण?
संतोष देशमुख हत्येचा तपास करणारे अधिकारी बदलण्यात आले आहेत. तर आता सुभाष मुठे आणि अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला. तरी सर्व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले नाहीत. दरम्यान, या प्रकरणातील ८ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तर यामधून वाल्मिक कराडची सुटका झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सरपंच संतोष हत्या प्रकरणाशी संबंधिक मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्येचा तपास करणारे अधिकारी बदलण्यात आले आहेत. तर आता सुभाष मुठे आणि अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील पुढील तपास सुभाष मुठे आणि अक्षय कुमार ठिकणे करताना दिसणार आहेत. यासह शर्मिला साळुंखे आणि दिपाली पवार यांचाही तपास पथकात समावेश असणार आहे. तर तपास पथकात बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना कायम ठेवण्यात आलं आहे. एसआयटीचे नवीन अधिकारी कोण बघा व्हिडीओ
Published on: Jan 14, 2025 01:40 PM