मंत्र्यांकडून झाडाझडतीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईची जाग, काय आहे प्रकरण?

| Updated on: Jul 28, 2023 | 7:48 AM

VIDEO | मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह गिरीश महाजन यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराचे काढले वाभाडे

जळगाव, 28 जुलै 2023 | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जळगाव जिल्ह्यातील अवैध गावठी दारू विक्रीसंदर्भात आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांसह गिरीश महाजन यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. मंत्र्यांनी आगपाखड केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईची उशिरा जाग आलीय. गेल्या 24 तासात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून 27 गुन्हे नोंदवले असून 26 आरोपींना अटक केलीय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक व्ही. टी. भुकन यांनी यासंदर्भात माहिती दिली. एप्रिल महिन्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात गावठी दारू विक्रीचे 607 गुन्हे दाखल करून साडेतीन लाख लीटर गावठी दारू जप्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, जिल्हाभरात हायवे आणि रस्त्यावर असलेल्या ज्या हॉटेल्स, ढाब्यावर अवैध दारू विक्री केली जात असेल, अशा ठिकाणी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Published on: Jul 28, 2023 07:48 AM
बसचा छप्पर उडालेला व्हिडीओ व्हायरल, त्यादिवशी काय घडलं? बस चालकाने सांगितला घटनाक्रम…
Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाला चार दिवस सुट्टी, पण का? आमदारांना काय दिल्या सूचना?