जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी कांतारा स्टाईलनं आंदोलन, कर्मचाऱ्यांची भूमिका काय?

| Updated on: Mar 18, 2023 | 8:29 PM

VIDEO | सोलापुरातील भव्य मोर्चात जुनी पेन्शन योजनेसाठी कार्यकर्त्यांनी कांतारा स्टाईलने केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले

सोलापूर : सोलापूरमध्ये आज जुनी पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपातील आंदोलकांचा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कर्मचाऱ्यांसोबतच काँग्रेस राष्ट्रवादी तसेच ठाकरे गटाचे नेते सामील झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये. तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीवर सरकारी कर्मचारी ठाम आहेत. आमदार खासदारांना पेन्शन मिळते मग या कर्मचाऱ्यांना का मिळत नाही? हजारोंच्या संख्येने आज राज्यातील कर्मचारी रस्त्यावर उतरलेल्या आहेत मात्र सरकार याकडे लक्ष देत नाही. आगामी काळात या कर्मचाऱ्यांच्या रोशाला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावीच लागेल, अशी आक्रमक भूमिका सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी या मोर्च्यात मांडली. दरम्यान, या भव्य मोर्चात जुनी पेन्शन योजनेसाठी कार्यकर्त्यांनी कांतारा स्टाईलने केलेले आंदोलन लक्ष वेधून घेणारे ठरले.

Published on: Mar 18, 2023 08:26 PM
आमची संधी घालवली हे खरंय पण…, बाळासाहेब थोरात यांनी सल व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचं केलं जाहीर कौतुक
संतोष बांगर यांची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, ‘ही’ ऑडिओ क्लिप व्हायरल