पुरातून आजोबा वाट काढत होते, चालता-चालता अचानक वाहून गेले अन्…; बघा व्हिडीओ पुढे काय झालं
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने चांगलाच कहर केला आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा येथील काही भागांना मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. अशातच वाशिमचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोणता आहे तो व्हिडीओ बघा....
वाशीम जिल्ह्याला मुसळधार पावसाने चागलंच झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर कारंजा तालुक्यातील जयपूर- शाह परिसरातील नाल्याला पूर आला होता या पुरातून मार्ग काढत असताना एक वयस्कर व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात सापडले आणि पाण्यासोबत वाहून गेलेत. वयस्कर व्यक्ती पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येता गावकऱ्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता पुराच्या पाण्यात उतरून या वयस्कर व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. या वाहत्या पाण्यातून या वयस्कर व्यक्तीला गावकऱ्यांनी बचावलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या वयस्कर व्यक्तीचं नाव अवधूत इंगोले असे असल्याची माहिती मिळतेय. हे सत्तर वर्षीय आजोबा पूराच्या पाण्यात वाहून गेले होते तसेच निलेश वाघमारे हा तरूनही याच ठिकाणावरून वाहून गेला होता. सुदैवणे गावाकऱ्यांनी पुढे काही अंतरावर पुरात उडया घेऊन या दोघांनाही वाचावलं.