Special Report | पुढच्या 20 दिवसांत ओमिक्रॉन घातक ?

| Updated on: Jan 05, 2022 | 9:05 PM

कोरोनाचा (Corona Patient) विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे.  गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत, तर राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोनाचा (Corona Patient) विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे.  गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत, तर राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 8 करोना बाधित रुग्णाांच्या मत्युंंची  नोंद झाली आहे. कोरोनाची ही स्फोटक वाढ धडकी भरवणारी आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. दिवसभरात राज्यात ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनचे टेंन्शन वाढले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत 100 रुग्णांची नोंद झाल्याने मुंबई पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. दिवसभरात नागपूरमध्ये 11 तर ठाणे आणि पुणे मनपा प्रत्येकी 7 ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 797 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Special Report | महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही पण निर्बंध कोणते लागणार?
Sanjay Raut Uncut | भाजपविषयी गोव्याच्या जनतेत संताप – संजय राऊत