Omicron Variant | देशात ओमिक्रॉनचे 415 रुग्ण, 17 राज्यांमध्ये नव्या वेरियंटचा संसर्ग

| Updated on: Dec 25, 2021 | 12:42 PM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग देशातील  17 राज्यांमध्ये झाल्याची माहिती आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं 10 राज्यांमध्ये पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Aurangabad Election | औरंगाबाद राष्ट्रवादी शहर अध्यक्ष विजय साळवींची उचलबांगडी
Uttar Pradesh | उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पानमसाला व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाचा छापा