Special Report | ओमिक्रॉन व्हेरियंट ‘सुपर माईल्ड’
ओमिक्रोन सुपर माईल्ड असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. कारण नव्याने आढळलेल्या रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणे आहेत.
मुंबई : ओमिक्रोन सुपर माईल्ड असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. कारण नव्याने आढळलेल्या रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणे आहेत. कोरोनाचा नवा प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा फैलाव आता भारतात वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबईत आज दोन जणांचा ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National Institute of Virology) दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईत ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.
Published on: Dec 06, 2021 08:54 PM