Special Report | ओमिक्रॉनची लाट फेब्रुवारीत येण्याचा अंदाज
फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. अवघ्या 12 दिवसांपूर्वी फक्त दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉनचा फैलाव आता जगभरात होतोय.
मुंबई : फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. अवघ्या 12 दिवसांपूर्वी फक्त दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉनचा फैलाव आता जगभरात होतोय. दक्षिण आफ्रिकेचे शेजारी देशात याच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, त्यानंतर ब्राझिल, अमेरिका, कॅनडा,युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, साऊदी अरेबिया अशा आता जगभरात तब्बल 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानं चिंतेत आणखी भर पडलीय. ओमिक्रॉनचा सर्वात जास्त फैलाव ख्रिश्चन बहुल राष्ट्रांमध्ये होण्याची शक्यता आहे.