Video | 26 आणि  27 जून रोजी ओबीसींचे दोन दिवसीय शिबीर : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jun 13, 2021 | 6:20 PM

ओबीसी राजकीय आरक्षण कमी झाल्यानंतर अनेकांची वेगवेगळी मतं होती. याच मतांवर चर्चा व्हावी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये पार पडली. तसेच पुढील वाटचालवीरही यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या ओबीसींचे या महिन्याच्या 26 आणि  27 जून रोजी दोन दिवसीय शिबीर घेण्यात येणार आहे

पुणे: राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटले आहे. “ओबीसी राजकीय आरक्षण कमी झाल्यानंतर अनेकांची वेगवेगळी मतं होती. याच मतांवर चर्चा व्हावी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये पार पडली. तसेच पुढील वाटचालीवरही यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या ओबीसींचे या महिन्याच्या 26 आणि  27 जून रोजी दोन दिवसीय शिबीर घेण्यात येणार आहे,” अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याल अनेक कारणं असल्याचंही ते म्हणाले.

ह्यांचे एकच काम याला फोडा त्याला जोडा, Ashok Chavan यांचं BJP वर टिकास्त्र
Headline | आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल