चलो बुलावा आया है, रामलल्लाने बुलाया है… शिंदे सरकार अयोध्येत कोणत्या तारखेला घेणार दर्शन?
भाजपने श्रीरामाच्या दर्शनासाठी मेगा प्लान तयार केला आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचा हा मेगा प्लान तयार करण्यात आला आहे. येत्या ५ फेब्रुवारीला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ अयोध्येत दर्शनाला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिराचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं होतं पण ते उपस्थित नव्हते. तर संपूर्ण मंत्रिमंडळ एकदिवस ठरवू आणि अयोध्येत दर्शनाला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. यानुसार, भाजपने श्रीरामाच्या दर्शनासाठी मेगा प्लान तयार केला आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचा हा मेगा प्लान तयार करण्यात आला आहे. येत्या ५ फेब्रुवारीला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ अयोध्येत दर्शनाला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. राम मंदिराच्या दर्शनाबाबत भाजपचा मेगाप्लॅन तयार असून भाजपशासित राज्यांचे मंत्रिमंडळ अयोध्येत रामाच्या दर्शनाला जाणार आहेत. शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारी रोजी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतानाच शरयू किनारी महाआरतीही करणार असल्याचं सांगितलं जात आहे.