Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला, गर्भगृहात कोण असणार?
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी आजपासूनच विधीपूजन सुरू होणार आहे. तर २२ तारखेच्या प्राणप्रतिष्ठा पूजनावेळी गर्भगृहात कोण-कोण असणार आहे, याची माहितीही समोर आली आहे. बघा कोणा-कोणाला मिळणार मान?
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी आजपासूनच विधीपूजन सुरू होणार आहे. तर २२ तारखेच्या प्राणप्रतिष्ठा पूजनावेळी गर्भगृहात कोण-कोण असणार आहे, याची माहितीही समोर आली आहे. आज १६ जानेवारीला दशविधी स्नान आणि विष्णू पूजन, १७ जानेवारी रोजी शोभायात्रा निघेल आणि शरयू नदीचं पाणी मंदिरात आणलं जाईल. १८ जानेवारीला गणेश अंबिका पूजन आणि वास्तूपूजन, १९ जानेवारीला अग्नी आणि नवग्रहांची पूजा हवन होईल. २० जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहाला शरयू नदीच्या पाण्याचं स्वच्छ केलं जाईल. २१ जानेवारीला १२५ कळसांच्या पाण्याने रामलल्लांच्या मूर्तीला जलाभिषेक केला जाईल तर २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेला सुरूवात होईल आणि १ वाजेपर्यंत ही पूजा पूर्ण होईल.
Published on: Jan 16, 2024 11:58 AM