उद्धव ठाकरे यांचं नाशिकमधून जय श्रीराम! २२ जानेवारीला काळाराम मंदिरात दर्शन अन् गोदातीरी महाआरती
उद्धव ठाकरे येत्या २२ जानेवारी रोजी नाशिकमधील काळाराममंदिरातील रामाचं दर्शन घेणार आहे. २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचं शिबीर देखील आहे. या शिबीराच्या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराममंदिरातील रामाचं दर्शन घेणार आहेत. यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्यात.
मुंबई, ७ जानेवारी २०२४ : उद्धव ठाकरे येत्या २२ जानेवारी रोजी नाशिकमधील काळाराममंदिरातील रामाचं दर्शन घेणार आहे. एकीकडे राम मंदिरांचं अयोध्येत लोकार्पण तर दुसरीकडे उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराममंदिरातील रामाचं दर्शन घेऊन गोदावरीच्या तीरावर महाआरती करणार आहेत. २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचं शिबीर देखील आहे. या शिबीराच्या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराममंदिरातील रामाचं दर्शन घेणार आहेत. यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्यात. कोणाला कुठेही प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी म्हटलंय. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकमधील काळाराम मंदिर आहे. आपल्या वनवासादरम्यान श्रीराम ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्याच ठिकाणी या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. यामंदिरात प्रभू श्रीरामासह सीता आणि लक्ष्मण यांची काळ्या रंगाची मूर्ती आहे. त्यांचे दर्शन उद्धव ठाकरे घेणार आहे.